राजूला त्याची मांजर खूप त्रास द्यायची. तिच्या त्रासाला कंटाळून एके दिवशी राजू त्या मांजरीला लांब सोडून आला. पण तो घरी परत येण्याआधीच मांजर घरी हजर होती. दुस-या दिवशी राजूने त्या मांजरीला आणखी लांब ठिकाणी सोडून आला. पुन्हा तो येण्याआधी मांजर घरात हजर.
राजूला खूप राग आला. यावेळी त्याने मांजरीला खूप लांब, एका निर्जन ठिकाणी सोडले. थोड्या वेळाने राजूने बायकोला फोन करून विचारले, ‘काय गं, मांजर घरी आली का?’
त्यावर बायको- ‘हो, ती तर कधीच घरी पोचली.’
राजू - ‘मग तिला सांग की इथे येऊन मला घरी घेऊन जा...मी रस्ता चुकलोय’.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा