Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नक्षलवादी नेते कोबाड गांधी

नक्षलवादी नेते कोबाड गांधी
गरीब परिस्थिती व शिक्षणाचा अभाव ही नक्षलवादाची मुख्य कारणे मानली जातात. परंतु, कोबाड गांधींसमोर अशी काहीही परिस्थिती नव्हती. तरीही ते नक्षलवादाकडे वळाले. लंडनमध्ये झालेले शिक्षण, गडगंज पैसा, दिवंगत कॉग्रेस नेते संजय गांधी यांच्याशी मैत्री ही पार्श्वभूमी असतानाही कोबाड नक्षलवादी झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांना अटक करण्यात आली.

मुंबईतील एका उच्चभ्रू पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील ग्लॅक्सो कंपनीतील मोठे अधिकारी होते. मुळात कुटुंबातील संस्कार व घरातील परिस्थिती पाहता कोबाड यांनाही त्याच पद्धतीने शिक्षण व संस्कार मिळाले होते.

डेहराडून येथील शाळेत त्यांचे शिक्षण झाले. कॉग्रेस नेते संजय गांधी हे त्याकाळी त्यांचे वर्गमित्र होते. येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर सेंट झेव्हीयर्स महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. चार्टर्ड अकाउंटंटच्या कोर्सचा अभ्यास करण्यासाठी ते लंडनलाही गेले होते. अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ इंग्लंडमधील विविध कंपन्यांमध्येही काम केले. याच काळात डाव्या विचारांकडे ते ओढले गेले. मग त्यांनी डाव्या संघटनांमध्ये प्रवेशही केला.

कानू सांन्याल यांच्यानंतर नक्षलवादी गटांना वैचारिक खतपाणी देत आपले आयुष्य नक्षलवाद्यांसाठी समर्पित केलेले कोबाड गांधी सध्या तुरुंगात आहेत. त्यांना वर्षभरापूर्वीच अटक करण्यात आली आहे. राजकारणात उतरलेल्या कोबाड यांनी काही दिवसातच नागपूरातील गरीब आदिवासींना मदत करण्याचा निर्णय घेतला. माओवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचे ते सदस्य आहेत.

नक्षलवाद्यांचा प्रभाव नक्षल प्रभावित राज्यांसह इतरत्र वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. कोबाड यांना नक्षलवाद्यांचे फायनांन्सर म्हणूनही ओळखले जात. दिल्लीत त्यांना वर्षभराखाली अटक करण्यात आली असून, त्यांच्या सुटकेसाठी नक्षलवाद्यांनी अनेकदा प्रयत्न केले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi