Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nonveg Recipe : अळुच्या पानातला मासा

Nonveg Recipe : अळुच्या पानातला मासा
अस्सल खवय्या खाण्यासाठी दूरवर जातो तसा नवनवीन पदार्थ देखील स्वत: बनवून पाहत असतो. मांसाहारी खाणार्‍यांसाठी तर विविध पदार्थ तयार करणे आणि ते खाणे ही एक मोठी पर्वणीच असते. गावाकडे गेल्यानंतर उपलब्ध साधनसामुग्री लक्षात घेवून पदार्थ बनवणे ही एक कला असते. विशेषत: नेहमीच्या पदार्थापेक्षा वेगळे पदार्थ करणे आणि त्याचा आस्वाद घेतांना जो आनंद मिळतो, तो आनंद इतरांना शेअर करण्याच्या दृष्टीने अळूच्या पानातला मासा हा पदार्थ कसा बनवतात हे सांगत आहे.

साहित्य : कोणत्याही माशाचे दोन मोठे तुकडे, 2 अळूची पाने, 1 कप मीठ व हळद घालून शिजवलेला भात, 1 मोठा चमचा खोबरे, 4 हिरव्या मिरच्या, 6 पाकळ्या लसून, 1 लिंबाचा रस, मीठ.

कृती : खोबरे, लसुन, मिरच्या व मीठ बारीक वाटून माशाच्या तुकड्यांना लावून ठेवावे. अळूच्या पानांना लिंबाचा रस व मीठ लावावे. पानाच्या मधोमध निम्मा भात पसरावा व त्यावर मसाल्यात मुरलेला मासा ठेवावा. पानांच्या पुड्या करून किंवा दोर्‍यांनी बांधून त्या तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी परताव्यात. शक्यतो झाकण घालून मंद आचेवर परताव्यात. अगदी वेगळ्या चवीचा हा पदार्थ अळूच्या पानासकट खायचा असतो.

हा पदार्थ खाताना एकाच वेळेला भात, अळू आणि मासा याचा आस्वाद घेता येतो. या सोबत कुठलेही कालवण नसले तरी जेवण पूर्ण होते. अळूच्या पानामध्ये असलेले विविध घटक या निमित्ताने पोटात जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बीटचा हलवा