Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिकन बटाटा करी

चिकन बटाटा करी
सामग्री : ३०० ग्राम बोनलेस चिकन, २ कांदे, टोमॅटो प्युरी, ४ उकडलेले बटाटे, 2 चमचे गरम मसाला, 3 लहान चमचे चिकन मसाला, मीठ, तिखट, मीरपूड, 2 चमचे तेल, १/४ कप दूध, थोडी मलई, 4 चमचे दही, चिरलेली कोथिंबीर, थोडा तंदूर रंग.

कृती :
NDND
चिकन साफ करून त्याचे चौकोनी तुकडे करा. पाणी न घालता दही घुसळून घ्या, त्यात मीठ, तिखट, चिकन मसाला घालून हे तुकडे ५,६ तास मुरवत ठेवा. बटाटे उकडून घ्या. त्यातील १.५ बटाट्याच्या भाजीला करतो तशा फोडी करा आणि उरलेल्या बटाट्याचा लगदा करा. कांदा चौकोनी चिरा, तेल गरम करा, त्यात कांदा घालून परता, कांदा मऊ झाला की टोमॅटो प्युरी घालून परता. गरम मसाला घालून परता.

दही न घालता त्यात मुरवलेले फक्त चिकनचे तुकडे घालून परता. वाफ येऊ द्या, बटाट्याचा लगदा, थोडी मीरपूड, चवीनुसार मीठ, तिखट घाला. १/४ कप दूध घाला, पाणी घालून हवे तेवढे सरसरीत करा. उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घाला, हलक्या हाताने ढवळा, चांगली उकळी येऊ द्या. मलई घाला, थोडासा तंदूर रंग घाला, कोथिंबीर अगदी शेवटी घाला म्हणजे रंग छान येईल. भात, पोळी, पाव कशाही बरोबर खा.

Share this Story:

Follow Webdunia marathi