साहित्य : चिकन, तेल, बटर (लोणी), टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या.
कृती : चिकनचे आठ- दहा तुकडे करावे, कढाईत तेल व लोणीला (बटर) जिरे मोहरीची फोडणी द्यावी. त्यानंतर त्यात टोमॅटो बारीक चिरून टाकावेत. चांगले फेटून झाल्यानंतर त्यात स्वच्छ धुतलेले चिकनचे तुकडे टाकावेत. 10 ते 15 मिनिटांपर्यंत चांगले शिजू द्यावेत. डिशमध्ये आकर्षक सजविण्यासाठी कोथिंबिर, हिरव्या मिरच्या, काकडी यांनी सजवावे.