rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Chicken 65 Recipe स्वादिष्ट चिकन ६५ रेसिपी

chicken 65
, बुधवार, 4 जून 2025 (14:30 IST)
साहित्य-
बोनलेस चिकन-५०० ग्रॅम
मैदा किंवा तांदळाचे पीठ-दोन चमचे
दही-अर्धा कप
अंडी-एक
आले
लसूण
लाल तिखट-एक चमचा
धणे पावडर- तीन चमचे
हळद- अर्धा चमचा
हिरव्या मिरच्या-तीन
काळीमिरी
कढीपत्ता
लसूण
कांद्याची पात- अर्धा कप
लिंबाचा रस-तीन चमचे
मीठ चवीनुसार
तेल-पाच टेबलस्पून
कोथींबीर
ALSO READ: घरी बनवा स्वादिष्ट Chicken Ghee Roast जाणून घ्या रेसिपी
कृती-
सर्वात आधी बोनलेस चिकन घेऊन त्याचे तुकडे करावे आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. आता एका भांड्यात ठेऊन आले लसूण पेस्ट घालून लिंबाचा रस घालवा  आता अंडी देखील फोडून एका भांड्यात ठेवा. चिकन बाऊलमध्ये आले लसूण पेस्ट, मैदा किंवा तांदळाचे पीठ, हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर, अंडी आणि मीठ घाला, सर्व घटक चिकनमध्ये चांगले मिसळा आणि चिकन शिजवा आणि चिकन शिजवल्यानंतर, ते १५ मिनिटे बाजूला ठेवा जेणेकरून चिकन चांगले मॅरीनेट होईल. आता एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. चिकन तळून घ्या. चिकन चांगले तळले की, ते टिश्यू पेपरवर काढा जेणेकरून तेल टिश्यू पेपरने शोषले जाईल.आता एका पॅनमध्ये तेल घालावे. त्यात लसूण, मिरच्या, कढीपत्ता घालावा. व चिकन देखील घाला. आता त्यात टोमॅटो सॉस आणि लिंबाचा रस घाला व परतवून घ्या आणि गॅस बंद करा.आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांद्याची पात घाला आणि पॅन एका प्लेटने झाकून ठेवा जेणेकरून कोथिंबीरचा सुगंध चिकनमध्ये येईल. चला तर तयार आहे चिकन ६५ रेसिपी, नान सोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: चिकन करी रेसिपी
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Morning Heart Attack सकाळी हृदयविकाराचा झटका प्राणघातक का असतो, काय काळजी घ्यावी