साहित्य : चार रॉक क्रेब, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा सांबार मसाला, 20 ग्रॅम तांदळाची पिठी, 20 ग्रॅम रवा, चार छोटे चमचे तेल व मीठ चवीनुसार.
विधी : क्रेबला सर्वात आधी चांगले स्वच्छ करून त्याला दोन भागात कापून घ्यावे. त्यातील गिल आणि फॅट वेगळे काढावे नंतर ते धुऊन पाणी काढून टाकावे.
क्रेब्सवर मीठ, हळद आणि सांबार मसाला लावून अर्धा तास तसचे ठेवावे. तांदळाची पिठी आणि रवा एकत्र करून क्रेब्सला गुंडाळावे. एक पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात क्रेब्स तळून घ्यावे. वरून उरलेले तेल टाकून वर खाली करावे. गरम गरम सर्व्ह करावे.