Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Dinner Special Recipe: यखनी चिकन पुलाव

Yakhni Chicken Pulao
, सोमवार, 9 डिसेंबर 2024 (12:32 IST)
साहित्य-
चिकन - 500 ग्रॅम
बासमती तांदूळ - एक कप
पाणी - चार कप
तूप – दोन चमचे
तेल - दोन चमचे
कांदा - एक बारीक चिरलेला 
टोमॅटो - एक चिरलेला 
दही - दोन चमचे
लसूण-आले पेस्ट - एक टेबलस्पून
कोथिंबीर- दोन चमचे  
पुदिना - दोन चमचे चिरलेला 
दालचिनी, वेलची, लवंगा, कढीपत्ता 
जिरे - अर्धा चमचा 
हळद - अर्धा चमचा 
तिखट - एक चमचा 
धणेपूड- 1 चमचा 
गरम मसाला - अर्धा चमचा 
चवीनुसार मीठ 
 
कृती-
यखनी चिकन पुलाव बनवण्यासाठी सर्वात आधी चिकन स्वच्छ धुवावे. आता एका मोठ्या भांड्यात चिकन, पाणी, 1 दालचिनीची काडी, 2-3 वेलची, 2 लवंगा आणि 1 तमालपत्र घालावे.व चिकन शिजवण्यासाठी सुमारे 15-20 मिनिटे लागतील मऊ चिकन शिजल्यावर ते गाळून घ्या आणि सूप वेगळे करा. आता कढईत तेल किंवा तूप घालून गरम करावे. त्यात जिरे, दालचिनी, लवंगा, वेलची आणि कढीपत्ता घाला आणि नंतर बारीक चिरलेला कांदा घालावा.  नंतर त्यात लसूण-आले पेस्ट घालून परतून घ्या. आता त्यात उकडलेले चिकन टाका आणि दही घालून मसाल्याबरोबर 5 मिनिटे शिजू द्या. म्हणजे चिकन मसाल्याबरोबर चांगले मिक्स होईल.आता बासमती तांदूळ एका वेगळ्या भांड्यात धुवावा आणि 20 मिनिटे भिजत ठेवावा. नंतर हा तांदूळ एका पातेल्यात घालून त्यात तयार केलेला यखनी घालून भात शिजण्यासाठी त्यात याखनीप्रमाणे पाणी घालून झाकून ठेवावे. भात अर्धा शिजल्यावर मध्यम आचेवर आणखी 10-15 मिनिटे शिजू द्या.  कोथिंबीर आणि पुदिना घालावाम्हणजे पुलावची चव आणि सुगंध वाढेल. तर चला तयार आहे आपला यखनी चिकन पुलाव, गरम नक्कीच सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

International Anti Corruption Day 2024 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती