Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be %e0%a4%ad%e0%a4%9c%e0%a5%80 107043000010_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंडा भजी

स्वादिष्ट व कुरकुरीत

अड्याची भजी बनविण्याची पद्धत
साहित्य - 250 ग्रॅम चना डाळीचे बेसन, सहा अंडी, 500 मिलि तेल, दोन मोठे कांदे, 50 ग्रॅम हिरवी मिरची , 25 ग्रॅम आले, जीरे, ओवा, हिरवी कोथिंबीर, भजी खार.

पूर्वतयारी- बेसन बारीक चाळणीतून गाळूण घ्यावे, कांदे उभे कापूण घ्यावे, आले बारीक ठेसून घ्यावे, मिरच्या कापूण घ्याव्या, अंडे फोडून घ्यावे.
कृति- एका पातेल्यात बेसन घेवून त्यात अंड्याचे द्रावण टाकावे. भजी खार घालावा. जीरे व आले पेस्ट घालावी. चीरलेले कांदे टाकावे. हिरवी मिरची व कोथिंबीर घालून एकजीव करावे.

गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालावे. गॅसची आस वाढवून पाच-सात मिनिट तेल तापू द्यावे. तेल तापले असल्याची खात्री पटवून घेण्यासाठी तयार द्रावणातील थोडसे मिश्रण तेलात घालावे.

खात्री झाल्यावर भजी काढण्यास सुरूवात करावी. आपल्याला पाहिजे तेवढ्या आकाराची भजी काढण्यासाठी हातांने पाहिजे तेवढे मिश्रण सोडावे.
भज्यांना तांबूस रंग येईपर्यत भजी होवू द्यावी, स्वादीष्ट, कुरकूरीत गरम भजी घाण्याचा आनंद अ‍वर्णनिय असतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi