Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%a4 %e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%80 108111400022_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोश्त बिर्यानी

गोश्त तांदुळ
साहित्य- 1/2 किलो बोनलेस मटन, 1/2 किलो बासमती तांदुळ, 50 ग्रॅकांदे, 4 ग्रॅम कलमी, वेलची, लवंग, 1 तेजपान, 2 ग्रॅम शाही जिरे, 8 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, आले व लसूणपेस्ट, 5 ग्रॅम तिखट, पुदिना, कोथिंबिर, 400 ग्रॅम दही, 8 काड्या केशर, 50 ग्रॅम दूध, तूप, 250 ग्रॅम कणीक, मीठ चवीनुसार.
ND
कृती- सर्वप्रथम मटन धुऊन पाणी काढून टाकावे. दहीला फेटून त्यात कोथिंबिर, पुदिना व हिरव्या मिरच्या टाकाव्यात. केशर दूधात टाकून तापवून घ्यावे. दह्यात मटण मेरीनेट करावे. कढईत तूप, गरम मसाले, तिखट, मीठ आणि कांदे टाकून 30 मिनिटासाठी ठेऊन द्यावे.

तांदुळ स्वच्छ करून 20 मिनिट भिजवून ठेवावे. एका भांड्यात अर्धा लीटर पाणी उकळत ठेऊन त्यात मीठ, उरलेले गरम मसाले टाकावे. पाणी उकळ्यानंतर त्यात तांदुळ टाकावे. भात तयार झाल्यावर केशर मिश्रित दुधाचा अर्धा भाग मटनावर शिंपडावे. शिजलेल्या भात मटनावर पसरावा. उरलेले केशर मिश्रीत दूध तांदुळावर टाकावे. उरलेल्या तुपाला गरम करून भातावर टाकवे.

भांड्याला मळलेल्या कणकेने सील करून द्यायचे. मग भांड्याला कोळशाच्या शेगडीवर ठेवावे. जेव्हा भांड्याच्या बाजूने वाफ जायला लागेल तेव्हा शेगडीतून कोळशे काढून भांड्यावर ठेवावे. 45 मिनिटापर्यंत ठेवावे. झाकण काढून रायतेसोबत सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi