Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%9c %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%80 %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a8 109030300011_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चायनिज चिली चिकन

बोनलेस चिकन शिमला मिरची मैदा
ND
साहित्य : 500 ग्रॅम बोनलेस चिकन (लिंबू व मीठ लावून मॉरिनेट केलेले), 1/2 कप शिमला मिरची चिरलेली, 1/2 कप मैदा, 1 कप कार्नफ्लोर, सोया सॉस, 1 मोठा चमचा बारीक चिरलेली मिरची, 1 चमचा पांढरी मिरची पूड, 1 अंडी, आवश्यकेतनुसार तेल, चवीनुसार मीठ, हिरव्या कांद्याची पात.

कृती : एका भांड्यात मध्यम आकाराचे मॅरिनेट केलेले बोनलेस चिकनचे तुकडे टाकून त्यात मैदा, कॉर्नफ्लोर, 1 अंडा, मीठ, सोया सॉस आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून चांगल्या प्रकारे ‍परतावे मग कढईत 2 50 ग्रॅम तेल गरम करून त्यात चिकनच्या तुकड्यांना तळून घ्यावे.

एका भांड्यात थोडसं तेल गरम करून त्यात कांदे, लसूण, सोया सॉस, हिरव्या मिरच्या, पांढर्‍या मिचर्‍यांची पूड, पातीचे कांदे लांब लांब कतरलेले टाकून ‍त्यात चिकनचे तुकडे आणि दीड कप पाणी टाकावे. नंतर त्यात शिमला मिरचीचे तुकडे, 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोर पाण्यात मिसळून त्यात टाकावे. या प्रकारे रसा घट्ट झाल्यावर त्यात 1/2 चमचा लिंबाचे सत्व टाकून 5 मि‍निट शिजवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi