साहित्य- 500 ग्रॅम बासमती तांदूळाचा भात, 125 ग्रॅम पत्ताकोबी, कांद्याची पात, 2 गाजर, 1/2 वाटी हिरवे मटार उकळलेले, 10-15 मशरूमचे टुकडे, 1/2 पाकीट सिजनिंग, 2 मोठे चमचे सोया साँस, अजीनोमोटो, 2 मोठे चमचे रेड चीली साँस, 250 ग्रॅम मटनाचे तुकडे, तळण्यासाठी तेल, 2 सिमला मिरच्या.
कृती- एका कढईत एक मोठा चमचा तेल गरम करून त्यात सर्व भाज्या चिरून टाका व उकळलेले मटर टाकून चांगले मिक्स करून घ्या. त्यात मटनाचे तुकडे, सोया साँस, चिली साँस, सिजनिंग, मशरूमचे तुकडे, चवीनुसार अजिनोमोटो टाकून मिक्स करा. नंतर त्यात तयार भात घालून मिक्स करा. गरम गरम पुलाव टोमॅटो किंवा चिली साँस टाकून सर्व्ह करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा