Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a8 %e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80 109031400051_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिकन करी

चिकन आलंलसणाची पेस्ट लवंगा कलमी धने पूड
ND
साहित्य : 1 किलो चिकन, 2 टी-स्पून आलं-लसणाची पेस्ट, 4 लवंगा, 1 लहान तुकडा कलमी, 2 चमचे धने पूड, हळद, 2 चमचा रिफाइन्ड तेल, 250 ग्रॅम कांदे, 2 तेजपान, 2 लहान वेलदोडे, ‍1 चमचा तिखट, 2 चमचा गरम मसाला.

कृती : ‍सर्वप्रथम चिकनला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. 1 कांद्याला लहान तुकड्यांमध्ये कापून वेगळे ठेवावे. बाकी उरलेल्या कांद्याची पेस्ट तयार करावी. कुकरमध्ये तेल तापत ठेवावे त्यात लवंगा, तेजपान, कलमी व चिरलेला कांदा टाकून गुलाबी होईस्तोर परतावे. नंतर त्यात चिकन टाकून पाणी आटेपर्यंत चिकनला शिजवत राहावे. जेव्हा पूर्ण पाणी आटून जाईल त्यात कांदा, लसुण आणि आलाचे पेस्ट टाकून 10 मिनिटापर्यंत परतावे. नंतर त्यात हळद, तिखट, धने व गरम मसाल्याची पूड टाकून 20 मिनिटापर्यंत शिजवावे. मग त्यात 2 कप पाणी टाकून कुकरचे झाकण लावावे. 1 शीटी होईपर्यंत शिजवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi