साहित्य : 500 ग्रॅम चिकन, 200 ग्रॅम तूप, 200 ग्रॅम दही, 200 ग्रॅम कांदे, 100 ग्रॅम आलं, 1/2 वाटी गरम मसाला, 3/4 छोटा चमचा मीठ, 2 लहान चमचे तिखट, 3 छोटे चमचे धने पूड, 4-5 तेजपान.
कृती : 1 मध्यम आकाराच्या कांद्याला बारीक कापून तुपात परतून घ्यावे. त्यात धुतलेले चिकनचे तुकडे टाकून परतून घ्यावे. नंतर या तुकड्यांना तुपातून बाहेर काढून घ्यावे. बाकी उतरलेले कांदे, आलं, तिखट व धने पूड टाकून पेस्ट बनवून घ्यावी. गरम तुपात तेजपान व गरम मसाला घालून परतून घ्यावे व त्यात परतून ठेवलेला कांदा व टाकावा. नंतर त्यात दही घालून मिश्रण एकजीव करावे, सर्वात शेवटी त्यात परतून ठेवलेले चिकनचे तुकडे टाकावे. कुकरमध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घालून 10 मिनिट शिजवावे. गरम गरम चिकन सर्व्ह करावे.