साहित्य : 8 चिकन ब्रेस्टस, 400 मिलीलीटर पांढरा सॉस, 4 तुकडे आरटिचोक, 40 ग्रॅम अक्रोड, 2 सिमला मिरच्या, 40 ग्रॅम सलामी स्लाइज, 1 लहान चमचा काश्मिरी तिखट, 1 लहान चमचा मीठ, 3/4 कप ताजे क्रीम, 1 मोठा कांदा चिरलेला, 1 लहान चमचा ओरीगेनो, 2 टोमॅटो, 1 लहान चमचा थाइम, 1 लहान चमचा चिव्स, बेसिल (वाळलेली), 4 चमचे तेल, 20 ग्रॅम लोणी, 2 लहान चमचा कांदे पूड, 1 लहान चमचा लसूण पेस्ट, 4 भाजलेले बटाटे.
कृती : तेल गरम करून त्यात चिकन ब्रेस्टसला दोन्ही कडून 3-4 मिनिट परतावे. त्यावर तिखट, कांदा व लसूण पावडर, थाइम व मीठ टाकावे. एका पॅनमध्ये लोणी गरम करत ठेवावे व त्यात चिरलेला कांदा टाकून परतावे. आरटिचोक, सिमला मिरचीच्या फोडी, आक्रोड, सलामी स्लाइज, ओरीगिनो, बेसिल, चिव्स व चिरलेले टोमॅटो टाकून नरम होईपर्यंत शिजवावे. शिजलेल्या चिकनमध्ये पांढरा सॉस व क्रीम नरम होइस्तोर शिजवावे. भाजलेल्या बटाट्यांबरोबर सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा