साहित्य :
चिकन 200 पाव, आले, 2-3 लसूण पाकळी, काळी मिरी, कॉर्नफ्लोर 3 चमचे, एक अंडे, चिली सॉस, मीठ चवीनुसार.
कृती :
आले-लसूण पेस्ट बनवून घ्या. कुकरमध्ये ही पेस्ट थोड्या तेलात परतवून घ्या. त्यात चिकन टाका. त्यात काळी मिरी टाका. हे 15-20 मिनिटे शिजवून घ्या. नंतर सर्व हाडे काढून घ्या. उकळलेल्या चिकनचे पाणी कमी आचेवर ठेवून त्यात कॉर्न फ्लोर टाका. या मिश्रणात वरील साहित्य टाका. चिकनचे छोटे-छोटे तुकडे करून टाका. एक अंडे फोडून टाका. पंधरा ते वीस महिने शिजवा. गॅस बंद करून यात चिली सॉस टाका. व गरमागरम चिकन सूप सर्व्ह करा.