साहित्य : चिकन सूपच्या दोन क्यूब, 4 कप पाणी, 2 कप टोमॅटो ज्यूस, अर्धा टेबलस्पून व्हिनेगर, 4 लवंगा, 3 मिरे, 2 चमचे कोथिंबीर चिरून, दीड चमचा मीठ, 1 चमचा साखर, 1 टेबलस्पून बटर, एक अंडं उकडून.
कृती : टोमॅटोचा रस, पाणी उकळन ठेवावं. चिकन क्यूबचा चुरा करून त्यात घालावा. त्यातच मिरे, लवंगा, व्हिनेगर, मीठ साखर घालून उकळी आणावी. आता दुसऱ्या जाड बुडाच्या पातेल्यात बटर पातळ करावं. त्यावर टोमॅटो दोन मिनिटं परतून त्यावर उकळलेलं सूप ओतून एक उकळी आणावी. त्यातच उकडलेलं अंडं सोलून किसावं. कोथिंबीर घालून द्यावं. आवडत असल्यास कोथिंबिरीऐवजी पुदिन्याची तीन-चार पानं चिरून वरून घालावी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा