Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%a6%e0%a4%ae %e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%a4 %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5 109032400072_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दम गोश्त-पुरी पुलाव

दम गोश्तपुरी पुलाव
NDND
सामग्री:
अर्धा किलो बासमती तांदुळ, अर्धा किलो मटन, 125 ग्रॅम मैदा, एक अंडी, एक लहान चमचा तेल, 5 काळीमिरे, इलायची, 5 लवंग, कापलेली हिरवी मिरची, दहा ते बारा लसनाच्या पाकळ्या. आलं, एक मोठा कांदा कापलेला, कोथिंबीर व चवीनुसार मीठ.

पध्दती:
बासमती तांदुळ अर्धा तासापर्यंत पाण्यात ‍भिजवून ठेवा. लसून, आलं, कांदा, इलायची, लवंग, काळेमिरे व कोथिंबीर बारीक करून पेस्ट तयार करा. एका कढाईत थोडे तेल घेऊन त्यात पेस्ट कलचून घेऊन अर्धा ग्लास पाणी टाका व चांगले उकळा. त्यानंतर त्यात बारीक पिस केलेले मटन त्यात टाका. उकडी आल्यांनतर कापलेली हिरवी मिरची व थोडे मीठ टाकावे.

तांदुळ मधील पाणी नितारून घेऊन वेगळ्या भांड्यात उकळून घ्या. कढाईतील मटन शिजल्यानंतर तयार झालेला भात टाकून द्या. त्यानंतर त्यात थोडे पाणी टाकून चांगले उकळू द्या. तव्यावर मैद्याच्या पुरी तयार शेकून घ्या. नंतर एक लहान हंडी घेऊन तिच्या तळाशी पुलाव्यातील मटन टाका. त्यानंतर त्यावर तयार झालेला पुलाव व त्यावर मैद्याची पूरी ठेवा त्यांनर उरलेले मटनाचे तुकडे ठेवा.

हंडीवर व्यवस्थित झाकन ठेऊन 15 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. त्यानंतर त्यावर वरून बारीक केलेली कोथिंबीर व केशर टाका. तयार झालेला दम गोश्त पुरी पुलाव टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi