साहित्य : मटण 1 किलो, 1 कप तूर व मसूर डाळ, 4 चमचे चण्याची डाळ, 2 चमचे मूग डाळ, 4 कांदे, 4-5 टोमॅटो, लाल भोपळा 200 ग्रॅम, बटाटे 3-4, वांगे 2, मेथीचीपाने 2 कप, धणे, जिरे, सांबार मसाला 2 चमचे, आलं-लसूण पेस्ट 4 चमचे, काळेमिरे अर्धा चमचा लाल मिरच्या 4-5, थोडंसं सुंक खोबरं, पुदिना, कोथिंबीर, तेल, मीठ, हळद.
कृती : मटण स्वच्छ धुऊन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्यात आलं-लसूण पेस्ट व थोडंसं मीठ लावून ठेवा. कांदा, टोमॅटोही बारीक चिरून घ्या. धणे, जिरे, काळेमीरे, लाल मिरच्या व सुकं खोबरं हलकं भाजून बारीक वाटा. सर्व डाळी अर्धा तास भिजत ठेवा. वांगे, भोपळा, मेथी, बटाटे बारीक चिरा. मटणाचे तुकडे, सर्व भाज्या, लाल तिखट, एका कांद्याचे तुकडे, हळद, मीठ व सर्व डाळी कुकरमध्ये शिजत ठेवा.
मटण शिजेपर्यंत शिट्या घ्या. नंतर मटणाचे तुकडे काढून बाजूला ठेवा. डाळी व भाज्या रवीने घुसळून एकजीव करा. दुसर्या भांड्यात तेल गरम करून त्यात उरलेला कांदा चांगला परता. मग त्यावर टोमॅटो घालून परता. त्यावर वाटलेला मसाला, सांबार पावडर घालून तेल सुटेपर्यंत परता. ह्या मसाल्यात डाळी-भाज्यांचं मिश्रण, मटणाचे तुकडे घालून एकत्र करा. मीठ घाला व 5 मिनिटं शिजवून गॅस बंद करा. पुदिना व कोथिंबिरीने सजवा.