Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%a1 %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a8 109042500025_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्रेज्ड चिकन

(तेलात भाजलेली कोंबडी)

चिकन कोंबडी मीठ मिरी लसूण
ND
साहित्य : 800 ग्रॅम अख्खी कोंबडी साफ करून, धुवून, सुकवलेली, 2 छोटे चमचे मीठ, 1/4 छोटा चमचा मिरी पूड, 6 पाकळ्या लसूण वाटलेला, 2 मोठे चमचे टोमॅटो केचप, 1 मोठा चमचा वर्सेस्टर शायर सॉस, 1 मोठा चमचा सोया सॉस, 1 मोठा चमचा विनेगर, 2 मोठेचमचे वनस्पती तेल, 1/4 कप पाणी.

कृती : कोंबडीवर मीठ, मिरी आणि लसूण चोळा, टोमॉटो केचप, वर्सेस्टर शायर सॉस, सोया सॉस आणि विनेगर मिसळा. कोंबडी या मिश्रणात 2 तास मुरवत ठेवा. कोंबडी काढा आणि सहज हाताळता यावी म्हणून पाय शरीराशी बांधून ठेवा, मुरवण राखून ठेवा. कुकरमध्ये तेल गरम करून कोंबडी घाला आणि सर्व बाजुंनी तांबूस तळून निघावी म्हणून फिरवत आणि खाली दाबत रहा. नंतर त्या पाणी आणि मुरवण घाला व कमी आच करून 5 मिनिटे शिजवा. कुकर आचेवरून काढा, तसाच थंड करत ठेवा. कुकर उघडा व मध्यम आचेवर ठेवा आणि द्राव अर्धा होईपर्यंत उकळावा. कोंबडी सॉससह गरम गरम वाढा.

Share this Story:

Follow Webdunia marathi