साहित्य : 6 अंडी, 6 लहान बटाटे, 2 चिरलेले टोमॅटो, 2 चमचे तेल, 1 बारीक चिरलेला कांदा, 1/2 नारळाचा किस, 3 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच लांबीचा आलेचा तुकडा, 1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, कोथिंबीर चिरलेली.
कृती : अंडी आणि बटाटे उकळून त्यांना मधून चिरून घ्यावे. तेल गरम करून त्यात आधी कांदे-लसूण सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावे. नारळाचा बुरासुद्धा परतून घ्यावा. हिरव्या मिरच्या, तिखट, हळद, नारळ व कांदे-लसूण, मीठ, गरम मसाला, आलं आणि कोथिंबिरीची पेस्ट तयार करावी. अंडी आणि बटाट्यात हे मिश्रण सावधगिरीने भरावे.
तेल गरम करून त्यात बाकी उरलेले कांदे व टोमॅटोला परतावे. नंतर त्यात भरलेले बटाटे, अंडी व उरलेला मसाला घालावा. थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे. कोथिंबीर ने सजवून सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा