साहित्य : 1 किलो बोनलेस मटण, 200 ग्रॅम हरबऱ्याची डाळ, 150 ग्रॅम परतलेले कांदे, 50 ग्रॅम लसूण, 10-10 ग्रॅम बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिना, 2 चमचे तिखट, 1/2 चमचा हळद, 5 ग्रॅम लवंगा, वेलदोडे व कलमी, 3 अंडी, 1 लिंबू, मीठ चवीनुसार.
कृती : हरबऱ्याची डाळ, मटण, लाल तिखट, हळद, साबूत गरम मसाल्याला एकत्र उकळून घ्यावे. पाणी आटोस्तोर शिजवावे. नंतर यांची पेस्ट तयार करावी. अंडे, मीठ व लिंबाचा रस काढून एकजीव करावे. कटलेट बनवून तेलात तळून घ्यावे. सर्व्ह करताना कांदे व पुदिन्याची चटणी सोबत करावे.