साहित्य : 500 ग्रॅम मटण कुकरमध्ये शिजवून घेतलेले, २५० ग्रॅम तूप, 200 ग्रॅम दही, २०० ग्रॅम कांदा, १० ग्रॅम आलं, 3 लहान चमचे धने पूड, २ लहान चमचे तिखट, ३/४ लहान चमचा मीठ, ४-५ तमालपत्र, १/२ वाटी साबूत गरम मसाला (जिरा, काळे मिरे, छोटी वेलची, लवंग, जायफळ, जावीतरी).
कृती : 1 कांदा कापून वेगळे ठेवावा. उरलेला कांदा, आलं, धने पूड व तिखट मिसळून वाटून घ्यावे. तूप गरम करून त्यात कापलेले कांदे व मटण तूपमध्ये परतून घ्यावे.
गरम तुपात साबूत गरम मसाला व तमालपत्र टाकावे व त्यात वाटलेले साहित्य घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. त्यात नंतर दही घालून चांगले परतावे. व शिजलेले मटण आणि मीठ घालून एकजीव करावे. दीड ते दोन कप पाणी घालून कुकरामध्ये 10 मिनिट शिजवावे. गरम गरम सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा