साहित्य : 1 मोठा चमचा तेल, 1/4 खोबरे किसलेले, 3 लवंगा, 3 काळे मिरे, 1 चमचा खसखस, तीळ, धणे, जिरे, 1 लहान कांदा, 5 ग्रॅम आले, 10 पाकळ्या लसूण, 1 कप पाणी, 2 मध्यम कांदे उभे चिरलेले, 750 ग्रॅम मटण शोल्डर तुकडे केलेले, 1/2 चमचा हदळ, 1/2 चमचा लाल मिरची पूड, 2 छोटे चमचे मीठ.
कृती : तव्यात 1/2 चमचा तेल घालून त्या खोबरे, लवंगा, काळी मिरी, खसखस, तीळ, धणे आणि जिरे हे पदार्थ भाजा. त्यात तव्यात 1/2 मोठा चमचा तेल घालून बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परता आणि काढा. आले, लसूण, परतलेला कांदा आणि सर्व भाजलेले पदार्थांत थोडे पाणी घालून त्याची पेस्ट करा. कुकरमध्ये उरलेले तेल टाकून त्यात उभा चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परता. मांस घाला. ढवळा आणि बदामी होईपर्यंत परता. पेस्ट, हळद आणि मिरची पूड घाला. मांस चांगले बदामी होईपर्यंत परतत रहा. मीठ आणि उरलेले पाणी घालून किमान 10 मिनिट शिजवा.