साहित्य- पाव किलो मटन (लहान पिसेस केलेले), आले -लसणाची पेस्ट एक चमचा, एक चमचा मैदा, दीड चमचा लोणी, अर्ध चमचा मिरपूड, ब्रेडचे चारपाच तुकडे, एक कांदा सहा कप पाणी व चवीपुरते मीठ.
कृती- मटनाचे तुकटे बारिक करून त्यांना स्वच्छ धुऊन त्याला मीठ व आले-लसणाची पेस्ट चोळून ठेवावी. एक ते दीड तासाने कढाईत पाणी उकळत ठेवावे. चांगली उकळी आल्यावर त्यात बारीक केलेले मटनाचे तुकडे टाकावेत व शिजू द्यावेत. त्यानंतर शिजलेल्या मटनाच्या तुकड्यांमधील पाणी बाजूला काढून घ्यावे. मटनाचे शिजलेले तुकड्यांचा दुसर्या कशासाठी तरी उपयोग करू शकतात. कांदा बारीक चिरावा. एका पातेल्यात लोणी जरा मऊ होईपर्यंत परतावे. त्यात मैदा टाकून पुन्हा परतावे. त्यात मटन शिजलेले पाणी टाकवे. त्यानंतर उकळू द्यावे. त्यात मिरपूड तसेच चव पाहून मीठ घालावं. त्यानंतर त्यात ब्रेडचे तुकडे तेलात तळून टाकावे. सर्व करतांना अर्ध चमचा बटर टाकावा.