साहित्य : 1 किलो तांदूळ, एक किलो चिकन, २५० ग्रॅम रिफाइंड तेल, ५०० ग्रॅम चिरलेला कांदा, 1 कप टोमॅटो चिरलेले, एक कप दही, १०-१५ हिरव्या मिरच्या लांब लांब कापलेली, 5 ग्रॅम दालचिनी, वेलची व लवंगा, एक मोठा चमचा आलं-लसूण पेस्ट, 2 लीटर पाणी, मीठ चवीनुसार.
कृती : तांदूळ स्वच्छ करून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावे. चिकनचे मोठे मोठे तुकडे करून घ्यावे. तेल गरम करून त्यात कांदे परतून घ्यावे, नंतर त्यात हिरव्या मिरच्या, वेलची, दालचिनी, लवंगा घालून चांगले परतून घ्यावे.
कांदे चांगले परतून झाल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट टाकावे व टोमॅटो घालून परतून घ्यावे. नंतर त्यात चिकनचे तुकडे, दही व मीठ घालावे. चिकनला शिजू द्यावे त्यात तांदूळ व पाणी घालून वर झाकण ठेवून भात चांगला शिजू द्यावा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा