साहित्य- अर्धा किलो चिकन, २ कांदे, २ शिमला मिरची, २ लिंबू, आल्याची पेस्ट, हिरव्या मिरच्या चार, गरम मसाला, काळी मिरी पावडर, तेल, मीठ चवीनुसार.
कृती- प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. शिमला मिरच्या, कांदा उभे चिरून घ्यावेत. कढईमध्ये तेल टाकून त्यात शिमला मिरचीचे तुकडे, कांदे व आल्याची पेस्ट टाकून परतवून घ्यावे. त्यानंतर त्यात गरम मसाला व हिरवी मिरची घालावी. नंतर चिकनही हव्या तितक्या पाण्यात शिजवून घ्यावे. मंद गॅसवर हे सर्व मिश्रण पंधरा मिनिटं ठेवावे. गॅस बंद केल्यानंतर त्यावर चार चमचे लिंबाचा रस घालावा. त्यानंतर वरून काळी मिरीची पावडर टाकून गरमागरम सव्र्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा