साहित्य : एक किलो मटण, 250 ग्रॅम तेल, 250 ग्रॅम कांदे, 200 ग्रॅम लसूण, 125 ग्रॅम आले, 250 ग्रॅम खोबरे, 125 ग्रॅम खसखस, 10 ग्रॅम वेलदोडे, 100 ग्रॅम धने, जीरे मीरे, कोथिंबीर 125 ग्रॅम शुद्ध गरम मसाला, 100 ग्रॅम तिखट.
कृती : सर्वप्रथम कढईत सर्व प्रकारचा मसाला भाजून घ्यावा. कढईत तेल घालून कांदा, लसूण, आले, वाटलेला गरम मसाला, खोबरे, खसखस पेस्ट भाजून घ्यावी.
संपूर्ण मिश्रण तांबूस रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजावे. फोडणी देण्याकरिता गॅसवर अँल्यूमिनियमचे पातेले ठेवून त्यात तेल घालावे.
तेल तापल्यानंतर मसाल्याचे भाजलेले मिश्रण घालावे. मिरची पावडर सोडून तेलात चांगली भाजून घ्यावी. उकडण्यास ठेवलेले मटण शिजल्याची खात्री करून घ्यावी. गॅसवर पातेले ठेवून त्यात भाजलेले तेल घालावे.
तेल चांगल्या प्रकारे तापल्यानंतर त्यात कढईत भाजलेले मिश्रण घालावे. मिश्रणात मटण टाकून चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. कोथिंबीर व मटणाचा गरम मसाला घालून पातेल्यावर झाकण ठेवावे.
पाच मिनिटानंतर झाकण काढूण गरम केलेले पाणी त्यात घालावे. मटणाचा रस्सा जास्त घट्ट किवा पातळ होऊ नये याची काळजी घ्यावी.
About Writter
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....