Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a5%80 %e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%80 %e0%a4%ae%e0%a4%9f%e0%a4%a3 %e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80 109041800035_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सली बोटी (मटण करी)

मटण कांदा दालचिनी पाणी बटाटे
ND
साहित्य : 1 किलो मटण शोल्डर तुकडे केलेले, 2 कांदा चिरलेले, 3 तुकडे दालचिनी, 3 छोटे चमचे मीठ, 1 कप पाणी, 2 मध्यम बटाटे सोलून त्याचे तुकडे करून 2 कप पाण्यात 1/2 तास भिजवून पाणी निथळून टाकलेले, 1 चमचा साखर, 200 ग्रॅम जरदाळू 3 कप पाण्यात 3 तास भिजवून, बिया काढून निथळून घेतलेले. पाणी राखून ठेवणे, 8 ग्रॅम आले, 16 पाकळ्या लसूण, 1 कप तेल, 2 मोठे कांदे उभे चिरलेले.

कृती : आले व लसूण यांचे पेस्ट तयार करावे. कुकरमध्ये 1/2 तेल टाकून उभा चिरलेला कांदा घाला आणि गुलाबी होईपर्यंत परता आले-लसणाचे वाटण घालून काही सेकंद ढवळा. मास आणि बारीक चिरलेला कांदा घाला. ढवळा आणि मांस बदामी होईपर्यंत परता. दालचिनी, मीठ आणि पाणी घाला. चांगले मिसळून 15 मिनिटे शिजवा. बटाटे परतून त्याचे दोन भाग करा. उरलेले तेल गरम करून त्यात बटाटे परता. तव्यावर साखर घालून गडद तपकिरी होईपर्यंत सतत परता. जरदाळू आणि राखीव पाणी घाला. साधारण 5 मिनिटे शिजवा. मटण शिजल्यानंतर त्यात बटाटे व जरदाळू घाला आणि 5 मिनिटे अधुनमधुन ढवळत शिजवा. व गरम गरम वाढा.

Share this Story:

Follow Webdunia marathi