साहित्य : 5-6 सुरमुईचे तुकडे, अर्धी वाटी खोबरं, 7-8 बेडगी मिरच्या, अर्धी चमचा हळद, चिंच, 5-8 कोकम, 5-6 तिरफळे, मीठ, तेल.
कृती : खोबरं, हळद, मिरच्या, थोडीशी चिंच, बारीक मिक्सरमधून वाटून घ्यावे. मसाल्यात पाणी घालून हवं तेवढं पातळ करून गॅसवर शिजत ठेवावे. त्यात तिरफळे ठेचून घालावी. मीठ घालून उकळी आल्यावर सुरमईचे तुकडे धुऊन त्यात घालावे. सुरमई शिजली की कोकम घालून खाली उतरवावे.