Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%9f %e0%a4%91%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9f 110042000027_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेटल्ट ऑम्लेट

सेटल्ट ऑम्लेट अंडी कांदे
MHNEWS
साहित्य:- चार अंडी, चार ते सहा मोठे कांदे, तेल तीन चार चमचे, लाल तिखट दीड चमचा, गरम मसाला, अर्धी वाटी कोथिंबीर, एक चमचा मोहरी, हळद, हिंग व मीठ चवीप्रमाणे.

कृती :- प्रथम कांदे बारीक चिरून घ्यावेत. पसरट भांड्यात तेल गरम करावे. त्यात मोहरी, हिंग घालून फोडणी करून घ्यावी. त्यावर चिरलेला कांदा घालून झाकण ठेवावे व कांदा वाफेवर चांगला शिजवून घ्यावा. कांदा चांगला शिजला की त्यात हळद, मीठ, लाल तिखट, गरम मसाला घालून तेल सूटेपर्यंत परतावे. त्यात थोडी कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करावे. त्यावर एक एक अंडे फोडून टाकावे. पण ती ढवळू नयेत. मंद आचेवर पाच मिनीटे शिजल्यावर त्यावर उरलेली कोथिंबीर घालून गरम गरम भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावे.

स्त्रोत : महान्यूज

Share this Story:

Follow Webdunia marathi