Select Your Language
धरणीमाता
- अनिल धुदाट (पाटील)
तू माय मी लेकरू धरणीमाता तुला कसा विसरू रानात चरती गाय वासरू किल बिल करती चिमणी पाखरू मायेचा तुझ्या हा खेळ सुरु फुल झाडे रानात सारे शोभून दिसती फुलपाखरे पाहुनी आनंदी झालं तुझ लेकरू धरणीमाता तुला कस विसरू तू माय मी लेकरू नदी नाले झुळ झुळ करी गाणे गाती सुरात सारेदंग होऊन गेले रानात सारे कवतुक तुझे मी किती करू तू माय मी लेकरू