मराठी कविता : प्रश्न

सौ. माधुरी अशिरगडे

घायाळ सूर आळवू कसे 
दुखडे नवे सजवू कसे ?

ही वेदना सख्खी परी
सौख्यास मना पटवू कसे ?

सोडून अपुली पायरी
हळव्या मना पटवू कसे ?

लाचार होती ओढ ही
पण मागणे लपवू कसे ?

नादान स्वप्ने बेरकी
मी वास्तवा नटवू कसे ?

तू दान देण्या सज्जपण
प्रीतीस या पेलू कसे ?

खैरात तू केली परी
हे दान मी घेऊ कसे ? 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख स्वादिष्ट बंगाली फिश