माहीत होते मला हा अंधार जीवघेणा अशीच सोबत करणार मिळू पाहाणार्या सावलीसारखा
Subtro
कडक इस्त्रीचा देह यानेच अस्ताव्यस्त चुरगाळला प्रकाशाची फट शोधत होतं चुकार मन संपेलच कधी न कधी ही एक रात्र मुर्दाड आशा आसूसून पहात होती पण अंधराचं सूचक हास्य नजरेतून उपहास गाळीत हेच कुत्सित सत्य सांगत होतं की ही एक काळरात्र आहे, अनन्ताचं वरदान मिळालेली, 'दक्षिण धृवावरील'