सगळ्या घरादाराला एका धाग्यात बांधून ठेवते,
घरच्यांच्या सुखात, आपलं सुख ती शोधते,
किलबिलाट होतो तिच्याच मूळे घरी,
आई बाबांची असते ती सोनूली परी,
कुणास काय हवं?तिलाच असते बरं ठावं,
सासरी वागताना, सर्वांचं मन ही तिनं राखावं,
एवढी लीला कोण बरे दाखवू शकतं?
कन्या नावाचं रत्न च ते लिलया करून दावत !
म्हणून असावी एक तरी मुलगी घरी,
माया ममता नांदेल सर्वांचे घरीदारी!
...अश्विनी थत्ते