पाण्याचा एक थेंब, सम्पूर्ण जीवन त्यात,
पृथ्वीवरील सत्तर टक्के भाग व्यापला पाण्यात,
मोल पाण्याचे प्रत्येकाने ओळखले पाहिजे,
शक्य तितका अपव्यय टाळता आलाच पाहिजे,
जीवन ही असावं आपलं पाण्यापरी,
ज्यात मिसळलो आपण त्याचा रंग उतरे अंतरी,
पाण्यासाठी दाही दिशा फिरतो माणूस,
वाट बघून ही कधी कधी बरसे न पाऊस,
पाण्याविना करपतील शेत च्या शेतं,
जगणं पाण्या शिवाय कल्पना ही नाही करवत,
ज्याने मोल पाण्याच जाणलं मनापासून,
जगेल तो आणि जगवेल तो धन्य होऊन!
....जल दिवसाच्या शुभेच्छा !!
..अश्विनी थत्ते