Publish Date: Wed, 10 Nov 2021 (20:46 IST)
Updated Date: Wed, 10 Nov 2021 (20:52 IST)
खुशी तुझी तू माझ्या डोळ्यात बघू शकते,
पारावर नाही आनंदास, न बोलता ही समजू शकते,
मिळविले तू आहेस, पण मज मिळाले वाटे असे .
आप परका भेद न इथं,आहे ते भासे एकच असें,
काय म्हणू मी या भावनेस, एकरूप तुझ्याशी ,
करू न शकेल कुणी वेगळं, जोडी तुझी माझी अशी!.