Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 10 April 2025
webdunia

कोण काय, किती अन कसं जगणार

marathi poem
, सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (19:30 IST)
कोण काय, किती अन कसं जगणार,
काळाने घातलेलं आहे कोडं, तोच सोडवणार,
फक्त दरम्यानच आयुष्य आपलं आहे,
ते कसं घालवायच ते आपल्याला ठरवायच आहे,
प्रवास हा मजल दरमजल करत करायचा,
भेटलेल्या सहप्रवास्या शी वेळ घालवायचा,
कोणाची क्षणिक भेट आठवताच पळतो ताण,
कोणाची साथ खुप काळ, पण त्याची नसते जाण,
काही मात्र उगाचच करतात लुडबुड,
काही मात्र राहतात सानिध्यात पण उगवतात सूड,
काही दाखवतात स्वप्न रंगबेरंगी सूंदर,
काहीं सोबत वाटे तरंगावे आपणही हवेवर,
असा हा प्रवास थांबतो अचानकच एकदा,
दरम्यान चा प्रवास च आयुष्याची संपदा!
...अश्विनी थत्ते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

योग क्रिया जे आपण बसून देखील करू शकतो.