Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Kavita नेमकं कसं जगावं, शेवट पर्यंत समजत नाही!

love poem valentine
, गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (08:50 IST)
काही गोष्टी ना मनाला पटत नसतात,
पण त्याच नेमक्या आपल्याला कराव्या लागतात,
इतरांच्या हो मध्ये हो मिसळावा लागतो,
आपला जणू नंदी बैलच त्यावेळी होऊन जातो,
उगाचच भांडण नको, तंटा नको म्हणून प्रपंच हा,
एवढ्या साऱ्या तडजोडी केल्यात, अजून एक प्रयत्न हा!
असंच असतं मंडळी जीवन, कधी हो कधी नाही,
पण नेमकं कसं जगावं, शेवट पर्यंत समजत नाही!
...अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Health Tips :मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारात या गोष्टींचा समावेश करा