Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठीही फारशी सोपी नाही..

मराठीही फारशी सोपी नाही..
, बुधवार, 8 डिसेंबर 2021 (12:27 IST)
१. म्हणे " शिरा " खाल्ल्याने  " शिरा " आखडतात.
२. " काढा " पिऊन मग एक झोप " काढा ".
३. " हार " झाली की " हार " मिळत नाही. 
४. एक " खार " सारखी घरात येऊन नासधूस करते म्हणून तो तिच्यावर " खार " खाऊन आहे.
५. " पळ " भर थांब, मग पळायचे तिथे " पळ ".
६. " पालक " सभेत शिक्षकांनी पाल्यांच्या आहारात  मेथी, " पालक " इ. पालेभाज्या ठेवण्याचा सल्ला दिला.
७. " दर " वर्षी काय रे " दर " वाढवता..??
८. " भाव " खाऊ नकोस, खराखरा " भाव " बोल.
९. नारळाचा " चव " पिळून घेतला तर त्याला काही " चव " राहत नाही.
१०. त्याने " सही " ची अगदी " सही सही " नक्कल केली.
११. " वर " पक्षाची खोली " वर " आहे.
१२. खोबर्‍यातला मुलांचा " वाटा " देऊन मग बाकीच्याची चटणी " वाटा ".
१३. " विधान " सभेतील मंत्र्यांचे " विधान " चांगलेच गाजले.
१४. फाटलेला शर्ट " शिवत " नाही तोपर्यंत मी त्याला " शिवत " नाही.
१५. भटजी म्हणाले, " करा " हातात घेऊन विधी सुरू " करा ".
१६. धार्मिक " विधी " करायला कोणताही " विधी " निषेध नसावा.
१७. अभियंता  म्हणाला, इथे "बांध  बांध"
१८. उधळलेला " वळू " थबकला, मनात म्हणाला, इकडे " वळू " कि तिकडे " वळू ".
१९. कामासाठी भिजवलेली " वाळू " उन्हाने " वाळू " लागली.
२०. दरवर्षी नवा प्राणी " पाळत " निसर्गाशी बांधिलकी " पाळत " असतो.
२१. फुलांच्या " माळा " केसांत " माळा ".
 
मराठीची अवखळ वळणे....
ज्यांना तोंडावर "बोलून टाकणं" जमत नाही ते पाठीमागे "टाकून बोलत" राहतात. 
शहाणा माणूस "पाहून हसतो", निर्मळ माणूस "हसून पाहतो".
काम सोपं असेल तर ते आपण "करून पाहतो", अवघड असेल तर "पाहून करतो"
एकजण "लिहून बघतो" तर दुसरा "बघून लिहितो"
ही अशी सुंदर, लवचीक, अवखळ मराठी
 
आता हेच बघा ना,
एखाद्याचा सत्कार करताना आपण देतो श्रीफळ, तर हकालपट्टी करताना देतो नारळ!!
 
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
 
 
- सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

HRTC Recruitment 2021 हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये 332 ड्रायव्हर पदांसाठी भरती