Publish Date: Fri, 01 Dec 2023 (15:01 IST)
Updated Date: Fri, 01 Dec 2023 (15:04 IST)
काही काही गोष्टी, दिसताक्षणी भूतकाळात नेतात,
घालवलेला क्षण, पुन्हा जिवंत होऊन जगायला लावतात,
रमवतात त्या काळात पुन्हा, आनंद देतात,
कधी कधी डोळ्यात टचकन पाणीही आणतात,
क्षुल्लक ही असतील त्या, पण त्याक्षणी फारच अमूल्य,
ज्याचा तोच जाणतो, त्याचं खरं मूल्य,
कोणीही नाही सुटलं, या अजब परिस्थितीतून,
अजब गजब असलं तरीही, बघावं लागत अनुभवून.!