Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Kavita लग्न करायच म्हणजे, त्याच्या सोबत आलं पाहीजे जगता

dating tips for first date
, शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (14:55 IST)
आजकाल च्या मुली म्हणतात आमचे विचार पाहिजेत जुळले, 
भेटताना एकमेकांना सर्वंच स्वच्छ  पाहिजे असले!
शहाणी मंडळी असतात, ते एकमेकांना भेटतात,
आवडी निवडी न अपेक्षा आपल्या सांगू लागतात,
दोघेही धास्तावले, आपलं स्वातंत्र्य हिरावणार आता,
लग्न करायच म्हणजे, त्याच्या सोबत आलं पाहीजे जगता,
कित्ती ही हे करणार नाही ते करणार नाही सांगून  व्हा मोकळे, 
एकमेकांचे विचार कधीच पटत नसतात सगळे,
अन ते बंधनच वेगळे असते, हे मात्र खरं,
अमुकच करायचं न तमुकच व्हायला हवं, असं नसतं बर!
कोणतीही परिस्थिती समोर येते अकस्मात,
एकमेकांच्या ओढीनं उडी घ्यायची असते त्याच्यात,
तिढा आत्मीयतेने सोडवायचा असतो,
प्रत्येक वादाचा तोडगा न्यायालया जवळ नसतो,
जाऊ द्यावा काळ थोडा, परस्परांना द्या वेळ,
अपेक्षाच अपेक्षा लादून, जमत नसतो संसारात मेळ!
..अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेशर कूकरचा स्फोट टाळण्यासाठी 'या' 9 गोष्टी करा