वरवर कित्ती भासते जरी चांगले,
सल उठे काळजात, न ते दिसले,
काहीतरी रुतले असते खोलवर,
असें हसू ओठावर, पण ते वरवर,
जशी मना मिळे, जराशी उसंत,
सुसाट ते सुटे, होई न जरा शांत,
द्वंद्व चाले अंतरंगी, खऱ्या खोट्या संग,
जखमा खूप होती, रक्तबंबाळ अंतरंग,
कुणाला कशाची पडली नाही तमा,
काही सोसा तुम्ही, वर वर असतो मुलामा,
अशीच लढाई नेमेची चाले आत आत,
वर मात्र नेहमी सारखे, वागे ती नित्य!
...अश्विनी थत्ते