Publish Date: Fri, 18 Jun 2021 (09:36 IST)
Updated Date: Fri, 18 Jun 2021 (09:40 IST)
कित्ती पसारा करून ठेवतो आपण आठवणींचा,
गुंता होतंच जातो, जपलेल्या भावनांचा,
एक आठवावं तर दुसरी
तयारच असते अगदी,
मोकळं व्हावं म्हटलं तर,
आतमध्ये असते गर्दी,
काही आठवणी असतात
मऊ अन मखमली,
खास कप्प्यात सुरक्षित
आवरणा खाली दडलेली,
त्या नाही मिसळत हो
या भाऊ गर्दीत,
त्यांच्याच भरवश्यावर चालते
आपलं जीवन संगीत!