Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 21 April 2025
webdunia

Marathi Kavita मन हे असंच असतं उडत पाखरू

marathi poem
, बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (09:23 IST)
मन हे असंच असतं उडत पाखरू,
कल्पनेच्या विश्वात उडत राहतं भुरू भुरू,
कधी केलं असतं प्रेम त्याने,खूप कुणावर ,
पाहीले असतात स्वप्न,न येऊ देता ओठावर,
कधी त्याला गाठायची असतात ध्येय त्याच्या मनातले,
पण कुणीही समजून घेत नाही मनातले,
आपल्या मर्जीने वागायचं असतं मनमुरादपणे,
काही प्रकरणं सोडवायची असतात हळुवारपणे,
पण घडत नाही ना  मनासारखे सर्वच,
प्रत्यक्षात आणि मनाच्या दुनियेतील फरक ही तोच!
...अश्विनी थत्ते.
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career in M.Phil. Nursing: नर्सिंग मध्ये एम.फिल करून करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम, व्याप्ती जाणून घ्या