Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी कविता : केवळ खूप सहवास आहे

मराठी कविता : केवळ खूप सहवास आहे
, सोमवार, 17 एप्रिल 2023 (09:20 IST)
केवळ खूप सहवास आहे, म्हणून का कुणास समजता येतं,
खूप वर्षांची साथ आहे, म्हणून का कुणी ओळखू येतं,
ज्याला जस वागायचं तसच वागतो की माणूस,
डोळ्यातून पण त्यांच्या अजिबात लागत नाही मागमूस,
आपल्या शी बोलतोय, तेच खरं वाटतं आपल्याला,
पण ठरवून तो बोलतोय आपल्याशी, ते कुठं समजतंय माणसाला,
महाकठीण काम आहे, अश्या लोकांना समजायला,
कसं आपलं म्हणायचं ह्यांना, भितीच वाटते आपल्याला!
सर्वानाच येतो हा अनुभव कुठून ना कुठून,
पण कोण बोलेल ह्यावर, बसतात सर्व मूग गिळून!
...अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Hemophilia Day 2023 : जागतिक हिमोफिलिया दिन केव्हा आणि कसा साजरा करायचा जाणून घ्या