देव पाठवतो सर्वां पदरी काही देऊन,
कुणी कशाने होता श्रीमंत, पहा आजमावून,
कुणाचे रंग आपल्यास खूप भावतात,
कधी कधी गंध वेड जीवा लावतात,
अबोली चा रंग तिची साथ सोडत नाही,
करपून गेली ती, तरी रंग उडून जात नाही,
पण अबोली गुंफली मोगऱ्यात की बघावं रूप त्याचं,
माळला गजरा प्रेयसी न, की खुलत रूप तिचं,
न बोलता ही अबोली सोबत सर्वांची करते,
अंगणात आपल्या सदा फुललेली दिसते!
..अश्विनी थत्ते