Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शहाणपण...

शहाणपण...
, बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (18:01 IST)
कितीही पैसे द्या कामवाली घरच्या सारखं झाडत नाही आणि पोळीवाली आपल्या सारख्या पोळ्या करत नाही....
आई वडिलांसारखी छाया नाही आणि भावंडांसारखी माया नाही...
हॉटेलच्या बिर्याणीला घरच्या खिचडीची चव नाही आणि कितीही यूट्यूब बघा थिएटरची सर नाही...
साडीतलं सौदर्य कुठल्याच पोशाखात नाही आणि कितीही मेकअप करा साधेपणा सारखं सौदर्य नाही...
कितीही कलमं करा गावठी गुलाबाला तोड नाही आणि कितीही अत्तरं आणा जुई आणि मोगऱ्याची सर नाही...
शेताची सर बागेला नाही आणि बागेची सर टेरेसला नाही...
भाजी` भाकरीची चव पिझ्झा बर्गरला नाही आणि ग्राउंडची सर जिमला नाही...
पहिल्या प्रेमासारखं निरागस प्रेम नाही आणि जोडीदारासारखा आधार नाही...
कितीही tally वापरा त्याला खतावणीची सर नाही आणि पावकी-निमकीची मजा कॅलक्युलेटरमधे नाही...
कितीही परिश्रम करा दैवाशिवाय काही मिळत नाही आणि कितीही हुशार असा ईश्वरापुढं कुणाचंच चालत नाही...
कितीही पाणी द्या पावसाशिवाय झाड काही खुलत नाही कितीही पैसे असुद्या पण माणसांशिवाय काही भागत नाही...
अनुभवासारखा शिक्षक नाही आणि आयुष्य जगल्याशिवाय समजतच नाही...
मुलांशिवाय घराला शोभा नाही आणि नातवंडासारखा परमानंद जगात नाही...
शालीनतेसारखा दागिना नाही आणि झोपडीचं प्रेम बंगल्यात नाही...
स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही...
 
सुखाच्या क्षणी माणसांशिवाय शोभा नाही पण दुःखाशिवाय आपलं कोण ते कळतंच नाही...
भक्ती सारखी शांतता कशातच नाही आणि भगवंता एवढं बलवान कुणीच नाही...
घरची माया वृद्धाश्रमात नाही आणि म्हातारपणी मुलाशिवाय कुणीच नाही....
 
- सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Hacks: घरातील आरसे साफ करण्यासाठी, हे सोपे हॅक अवलंबवा