Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माणसाचं आयुष्यही असंच... एवढसं... क्षणभंगुर प्राजक्तासारखं

parijatak
, बुधवार, 13 मार्च 2024 (15:19 IST)
झाडावरुन प्राजक्त ओघळतो, 
त्याचा आवाज होत नाही, 
याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही'...
 
"प्राजक्त" किंवा "पारिजातक" 
किती नाजुक फुलं..!
 
कळी पूर्ण उमलली की, इतर फुलझाडांप्रमाणे फुल खुडायचीही गरज नसते. डबडबलेल्या डोळ्यांतून अश्रु ओघळावा, तसं देठातुन फुल जमिनीवर ओघळतं.
 
"सुख वाटावे जनात,
दुःख ठेवावे मनात"
 
हे या प्राजक्ताच्या फुलांनी शिकवलं.
 
एवढसं आयुष्य त्या फुलांचं..!
झाडापासुन दूर होतानाही गवगवा करीत नाहीत.
 
छोट्याशा नाजुक आयुष्यात आपल्याला भरभरुन आनंद देतात.
 
आणि केवळ आपल्यालाच नाही तर 
आपल्या कुंपणात लावलेल्या झाडाची फुलं शेजारच्यांच्या अंगणातही पडतातच की. 
 
खरंच... ! माणसाचं आयुष्यही असंच... एवढसं... क्षणभंगुर प्राजक्तासारखं... !
 
कधी ओघळून जाईल माहीत नाही.
 
आज आहे त्यातलं भरभरुन द्यावं हेच खरं...!!
 
- सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Online Kitchen ऑनलाइन किचन बिझनेस सुरु कसे कराल जाणून घ्या