दिवसभर हाताला चाळा एकच राहीला,
येऊन जाऊन मोबाईल मध्येच जीव सारा गुंतवला,
उगीचच मिनटा मिनिटा ला एकदा घेतो बघूनच,
काही आलंय का ? त्या क्षणी जाणून तो घेतोच,
गरज नसते बरं वारंवार त्यास हाताळण्याची,
पण वाईट सवय जडवली त्यात घुसून बसण्याची,
ते एक साधन आहे, आपल्या उपयोगी पडायला,
पण आपण त्याच्याच अधीन झालो, नवं नको सांगायला,
घरोघरी संवाद बंद झालाय, हे दिसून येतं,
मोबाईल नावच खेळणं जो तो घरी हातात घरून बसत!
भांडणं पण होतात त्यावरून, की बोलणं होतं नाही,
एकमेकांना काही सांगायला त्यांना उसंतही नाही.
तोडगा काढा, आपल्या आपल्या पद्धतीने,
बसवा थोडं कोपऱ्यात मोबाईलला,जगा मोकळेपणाने!